Join us

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या सामन्यात न खेळण्याची शक्यता

IND vs ENG 1st ODI : Virat Kohliची कामगिरी फार चांगली होताना दिसत नाही त्यात तो पहिल्या वन डे त खेळण्याची शक्यता कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 07:35 IST

Open in App

IND vs ENG 1st ODI : ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, आज खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताला धक्का बसला आहे. मधल्या फळीतील स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) या सामन्याला मुळण्याची चिन्हे आहेत. 

" तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विराटला दुखापत झाली. ही दुखापत क्षेत्ररक्षण करताना झाली की फलंदाजी करताना हे सांगणे अवघड आहे. पण तो पहिली मॅच खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे," असे संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले.

वन डे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा. शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद शमी, अर्षदी सिंग

वन डे मालिका 

पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली
Open in App