हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट'

रोहित शर्माला मोठा डावा साधण्याची संधी, बॅट तळपली तर तो अगदी सहज होऊ शकतो वनडेतील 'सिक्सर किंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:16 IST2025-02-05T16:09:55+5:302025-02-05T16:16:58+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st ODI Rohit Sharma Chance To Most Sixes In ODI Career Will Break Chris Gayles Record Shahid Afridi Top In List | हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट'

हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर गेलचा रेकॉर्ड; वनडेत 'सिक्सर किंग' होण्यासाठी थेट आफ्रिदीशी 'फाइट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 1st ODI : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत मोठा डाव साधण्याची संधी आहे. रोहित शर्मा हा क्रिकेटच्या मैदानातील उत्तुंग फटकेबाजीसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या भात्यातून लौकिकाला साजेसा खेळ झालेला नाही. पण आता तो पुन्हा एकदा आपल्यातील धमक दाखवण्यासाठी सज्ज झालाय. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एक षटकार मारताच ख्रिस गेलला ओव्हरटेक करेल रोहित  

इंग्लंड विरुद्ध नागपूरच्या मैदानात रंगणाऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माला कॅरेबियन स्टार ख्रिस गेलला ओव्हरटेक करण्याची मोठी संधी आहे. यासाठी त्याला फक्त एक षटकार मारायचा आहे. एक षटकार मारताच ख्रिस गेलला मागे टाकून हिटमॅन रोहित शर्मा वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचेल.   

रोहित वर्सेस गेल! वनडेत कुणी किती षटकार मारलेत?

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल आणि रोहित शर्मा हे दोन्ही फलंदाज संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. १९९९ ते २०१९ या कालावधीत ख्रिस गेलनं ३०१ वनडे सामन्यातील २९४ डावात ३३१ षटकार मारले आहेत.  रोहित शर्मानं २६५ सामन्यातील २५७ डावात ख्रिस गेल याला गाठलं आहे.  सध्याच्या घडीला रोहितच्या नावे ३३१ षटकारांची नोंद आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात एक षटकार मारताच तो गेलच्या पुढे निघून जाईल.

सध्याच्या घडीला कोण आहे वनडेतील सिक्सर किंग?

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील ३९८ सामन्यातील ३६९ डावात ३५१ षटकार मारले आहेत. जर रोहित पुन्हा आपल्या लयीत खेळताना दिसला तर आफ्रिदीचा विक्रमही फार काळ टिकणार नाही. यासाठी रोहित शर्माला अजून २१ षटकारांची गरज आहे.  इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हिट शोसह रोहितला वनडेतील सिक्सर किंग होण्याचीही संधी आहे.

Web Title: IND vs ENG 1st ODI Rohit Sharma Chance To Most Sixes In ODI Career Will Break Chris Gayles Record Shahid Afridi Top In List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.