IND vs ENG Hardik Pandya : पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट!

IND vs ENG, 1st ODI : वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याला मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) हातून कृणालला वन डे टीमची कॅप देण्यात आली आणि कृणालने इमोशनल होत भावाला घट्ट मिठी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:52 AM2021-03-24T09:52:15+5:302021-03-24T09:52:42+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 1st ODI : Hardik Pandya pens emotional note ahead of brother Krunal’s birthday  | IND vs ENG Hardik Pandya : पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट!

IND vs ENG Hardik Pandya : पहिल्या वन डेत भावनिक झालेल्या कृणालसाठी हार्दिक पांड्याची मन जिंकणारी पोस्ट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st ODI : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( India all-rounder Krunal Pandya) यानं मंगळवारी टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण केलं. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याला मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) हातून कृणालला वन डे टीमची कॅप देण्यात आली आणि कृणालने इमोशनल होत भावाला घट्ट मिठी मारली. जानेवारीत निधन झालेल्या वडिलांची आठवण काढत ती कॅप आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि पदार्पणात जलद अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा कृणाल कॅमेरासमोर वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला. डगआऊटमध्ये बसलेला हार्दिकही भावाला पाहून इमोशनल झालेला पाहिला. सामन्यानंतर हार्दिकनं त्याच्या भावना व्यक्त करताना भावासाठी पोस्ट लिहिली. ( Hardik Pandya pens emotional note ahead of brother Krunal’s birthday ) कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video

कृणाल पांड्याचा आज ३० वा वाढदिवस आहे. मंगळवारी झालेल्या वन डे सामन्यात कृणालनं ३१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून वन डे पदार्पणातील जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. कृणालनं लोकेश राहुलसह ५७ चेंडूंत नाबाद ११२ धावांची भागीदारी करताना संघाला ३१७ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गडगडला आणि टीम इंडियानं ६६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच सामन्यातून पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) ४ विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड केला. पदार्पणात चार विकेट्स घेणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo!

सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं भावासाठी इमोशनल पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं की,''पप्पांना तुझा अभिमान वाटतोय. तुझ्या या खेळीनंतर त्यांना नक्कीच आनंद झाला असेल आणि वाढदिवसापूर्वी त्यांनीच तुला हे गिफ्ट दिलं आहे. तू याचा हकदार आहेस आणि तुझ्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण येत राहो. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे.'' 


कृणालनंही पोस्ट लिहिली ( Krunal Pandya also took to Twitter to post). ''प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात फक्त आणि फक्त तुमचाच विचार सुरू होता, पप्पा. तुम्ही माझ्यासोबतच आहात, असे वाटत होते आणि त्यामुळे डोळे भरून आले होते. तुम्ही माझी ताकद आहात आणि मला तुमचा कायम पाठींबा मिळत राहिला, त्यासाठी तुमचे आभार. ही खेळी तुमच्यासाठीच आहे आणि यापुढे आम्ही जे काही करू, तेही तुमच्यासाठीच असेल,'' असे कृणालनं लिहिलं.

Web Title: IND vs ENG, 1st ODI : Hardik Pandya pens emotional note ahead of brother Krunal’s birthday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.