IND vs ENG, 1st ODI, Krunal Pandya : कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video

अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या.

IND vs ENG, 1st ODI : ट्वेंटी-२० मालिकेत एक सामना खेळवून बाकावर बसवलेल्या शिखर धवननं ( Shikhar Dhawan) वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत अर्धशतकी, तर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत शतकी भागीदारी करताना धवननं संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला होता.

धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या.

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या.

विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून माघारी परतला. श्रेयस अय्यरही ( ६) वूडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेन स्टोक्सनं टीम इंडियाला मोठे धक्के दिले. रोहित, धवन आणि हार्दिक पांड्या ( १) यांना त्यानं बाद केलं.

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि अपयशी ठरूनही कर्णधाकडून सातत्यानं संधी मिळवणाऱ्या लोकेश राहुलनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कृणालनं अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.

कृणालपाठोपाठ लोकेशनेही अर्धशतक पूर्ण केले. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर कृणाल पांड्या जेव्हा चर्चेला आला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला.

पदार्पणाची कॅप हाती घेतल्यानंतर कृणालनं सर्वप्रथम हार्दिक पांड्याला मिठी मारली आणि वडिलांना आठवत त्यानं ती आकाशाच्या दिशेनं फडकावली. पदार्पणात अर्धशतक झळकावून त्यानं वडिलांना श्रद्धांजली वाहिली. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.

१६ जानेवारीला हार्दिक व कृणाल यांचे वडील हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झाले. त्यावेळी कृणाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत होता आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरी परतला होता.