इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूरच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दोघांना पदार्पणाची संधी दिली आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालसह जलदगती गोलंदाज हर्षित राणा इंग्लंड विरुद्धच्या नागपूरच्या मैदानातून पदार्पणाचा वनडे सामना खेळताना दिसतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुडघ्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट'
विराट कोहली पहिल्या वनडेला मुकणार आहे. मॅचआधी दुखापत झाल्यामुळे तो हा सामना खेळू शकणार नाही, असे रोहित शर्मानं टॉस नंतर सांगितले. विराट कोहलीच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. मॅच आधी सरावावेळी त्याची झलक पाहायला मिळाली होती. गुडघ्याला पट्टी बांधून तो मैदानात दिसला होता. दुसऱ्या सामन्यात तो या दुखापतीतून रिकव्हर होईल, अशी अपेक्षा आहे.
पंतऐवजी लोकेश राहुलला पसंती
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघात विकेट किपर बॅटरच्या रुपात कुणाला संधी मिळणार याचीही जोरदार चर्चा होती. यात अपेक्षेप्रमाणे रिषभ पंतऐवजी लोकेश राहुलला पसंती मिळाली आहे. ऑलराउंडरच्या रुपात हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेट कीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, साकिब महमूद.