Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली पत्रकाराच्या फोनवरून 'ही' गोष्ट

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने रिषभ पंतवर स्लेजिंग केल्यानंतर एक मजेशीर गोष्ट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 16:31 IST2019-01-04T16:21:25+5:302019-01-04T16:31:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ind vs Aus: When the captain of Australia speaks on a phone call of a journalist | Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली पत्रकाराच्या फोनवरून 'ही' गोष्ट

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली पत्रकाराच्या फोनवरून 'ही' गोष्ट

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चौथ्या कसोटी सामन्यात सध्यातरी भारताचे पारडे जड आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पण पेनने रिषभ पंतवर स्लेजिंग केल्यानंतर एक मजेशीर गोष्ट केली आहे. पेनने चक्क एका पत्रकाराच्या फोनवरून संवाद साधला. या संवादाचा हा खास व्हिडीओ पाहा...


सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यावर एक पत्रकार परिषद झाली. या परिषदेमध्ये पेन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होता. यावेळी एका पत्रकाराचा फोन खणाणला. त्यावेळी पेनने तो कॉल रीसीव्ह केला आणि समोरच्या व्यक्तीशी मजेशीर संवाद साधला.

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि पंत यांच्यात तोडीस तोड शेरेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. पेनच्या 'बेबिसिटिंग' टोमण्याला पंतकडून 'टेम्पररी कर्णधार' असे उत्तर पाहायला मिळाले. त्यांच्या या स्लेजिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही उडी घेतली आहे आणि त्याने गमतीशीरपणे स्लेजिंग करताना पंतचे स्वागत केले होते.

Web Title: Ind vs Aus: When the captain of Australia speaks on a phone call of a journalist