Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : फाजिल आत्मविश्वास हेच पराभवाचे कारण; भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर रवी शास्त्रींची जोरदार टीका

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १०९ धावा आणि दुसऱ्या डावात १६३ धावांवर सर्वबाद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 11:19 IST

Open in App

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १०९ धावा आणि दुसऱ्या डावात १६३ धावांवर सर्वबाद झाला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ ७६ धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि जे ऑस्ट्रेलियाने सहज गाठले व ९ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi shastri) हे या लाजिरवाण्या पराभवावर टीम इंडियाला फटकारताना दिसत आहेत. भारतीय संघ अतिआत्मविश्वासाने भरलेला होता, असा आरोप शास्त्रींनी केला आहे. 

पाकिस्तानातील लोकं तर...! भारतीय कर्णधार रोहित शर्मानं शेजाऱ्यांचं नाव घेतलं अन् केली बोलती बंद 

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. भारताने पहिली कसोटी एक डाव आणि १३२ धावांनी जिंकली होती, तर दुसरा कसोटी सामना ६ विकेट्सने जिंकला होता. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यात संघाची सर्व रणनीती फसली आहे.  टीम इंडियाच्या पराभवावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री संताप व्यक्त करताना दिसत आहेत. रवी शास्त्री म्हणाले की, 'थोड्याशा अतिआत्मविश्वासामुळे तुम्ही खेळाला हलके घेऊ लागता. खेळलेले शॉट्स तुम्ही पुन्हा पाहा आणि अशा परिस्थितीत वर्चस्व कसे मिळवायचे हे शिका.  

मॅथ्यू हेडनच्या मते, भारतीय संघातील खेळाडू प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतात. संघ बदलण्याची गरज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात समालोचन करताना मॅथ्यू हेडन म्हणाला, "केएल राहुलला संघातून वगळण्यात आले ज्यामुळे संघात अस्थिरता निर्माण झाली.प्लेइंग ११ मध्ये खेळाडू त्यांच्या जागेसाठी खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांची मानसिकता वेगळी राहते. ट्रॅव्हिस हेड पहिल्या कसोटीचा भाग नव्हता, पण जेव्हा तो दुसऱ्या कसोटीसाठी आला तेव्हा त्याने शानदार खेळ केला आणि ऑस्ट्रेलिया अशा गोष्टींसाठी ओळखला जातो.''

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्री
Open in App