Join us

IND vs AUS Test : स्लेजिंग तर आमच्या रक्तातच आहे, मायकल क्लार्कचे वादग्रस्त विधान

स्लेजिंग तर आमच्या रक्तातच आहे आणि ते करायलाच हवे, असे क्लार्कने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:36 IST

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध आहेत.ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-20 मालिका जिंकता आली नाहीत्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने संघामध्ये आक्रमकपणा भरण्यासाठी वादग्रस्त विधान केले आहे.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध आहेत. पण आतापर्यंतच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून स्लेजिंग पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-20 मालिका जिंकता आली नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने संघामध्ये आक्रमकपणा भरण्यासाठी वादग्रस्त विधान केले आहे. स्लेजिंग तर आमच्या रक्तातच आहे आणि ते करायलाच हवे, असे क्लार्कने म्हटले आहे.

भारताने ट्वेंटी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. ट्वेंटी-20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांतही पावसाने व्यत्यय आणला. दुसरा सामना तर पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताची सलग सात ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याच्या घोडदौडीला ब्रेक लागला. कसोटी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

क्लार्कने ऑस्ट्रेलियाच्या संघाला संदेश देताना सांगितले आहे की, " आक्रमकपणा हा ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच आहे. त्यांनी तो आक्रमकपणा जपायला हवा. गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही, याची मुख्य कारण ते आक्रमकपणे खेळलेलेच नाहीत. जोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमकपणे खेळत नाही, तोपर्यंत ते जिंकू शकत नाहीत. त्यामुळे यापुढे त्यांनी आक्रमकपणा दाखवायला हवा आणि जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवायला हवी. "

भारतीय संघाचा सराव सामना सुरु झाला असला, तरी पावसामुळे खेळ झालेला नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा सराव सामना पहाटे 5.30 वाजता सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. सकाळपासून सुरु असलेला पाऊस विश्रांती घेण्याच्या मुडमध्ये नव्हता. त्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रुमबाहेर पडताच येत नव्हते. त्यामुळे कोहली सहकाऱ्यांना जिममध्ये व्यायाम करण्यासाठी घेऊन गेला. त्यांनी बराच काळ जिममध्ये घालवला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामायकेल क्लार्क