Join us

IND vs AUS Test: 'बाप' माणूस रोहितची सिडनी कसोटीतून माघार, मुंबईसाठी रवाना

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 12:20 IST

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्माची सिडनी कसोटीतून माघार, मुंबईसाठी रवानारोहित शर्माला कन्यारत्न प्राप्ती झालीवन डे मालिकेसाठी 8 जानेवारीला ऑस्ट्रेलियात परतणार

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे ही आनंदवार्ता कळाली तेव्हा रोहित मिशन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, या आनंदी वार्तामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी रोहित मुंबईत दाखल होणार आहे आणि तो 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सिडनी कसोटीत खेळणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने याबाबत अधिकृत घोषणा केली. 

''रोहितला कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे तो रविवारीच मुंबईसाठी रवाना झाला आहे. बीसीसीआयकडून त्याचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. वन डे मालिकेसाठी तो 8 जानेवारीला पुन्हा ऑस्ट्रेलियात दाखल होईल,'' अशी माहिती बीसीसीआयने दिली. मेलबर्न कसोटीत रोहितने नाबाद 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत मुकणाऱ्या रोहितने बॉक्सिंग डे कसोटीत दमदार पुनरागमन केले. अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात तो खेळला होता आणि दोन्ही डावांत त्याने 37 व 1 धावा केल्या होत्या. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय