ठळक मुद्देपृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारहार्दिक पांड्या व मयांक अग्रवाल यांना संधीअखेरच्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सराव सामन्यात जायबंद झालेला भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. पूर्णपणे फिट नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून सलामीचं कोडं सोडवण्यासाठी मयांक अग्रवालला पाचारण करण्यात आले आहे. मुरली विजय आणि लोकेश राहुल यांचे अपयश लक्षात घेता पृथ्वीचे संघातील स्थान पक्के समजले जात होते. भारतासाठी आनंदाची वार्ता म्हणजे अष्टपैलू हार्दिक पांड्याने संघात पुनरागमन केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला.
हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून रणजी करंडक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली. मुंबईत झालेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात त्याने बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले. दुखापतीमुळे तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर परतलेल्या हार्दिकने दमदार पुनरागमन करताना मुंबईविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपली छाप पाडली. त्याने 137 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 73 धावा केल्या, तर त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स व दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार,
हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल.