ॲडिलेड : पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. विराटच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व अजिंक्य रहाणे याच्याकडे येईल. याविषयी कोहली म्हणाला, ‘अजिंक्य राहणेने याआधीही यशस्वी नेतृत्व केले आहे. या दौऱ्यातही रहाणे स्वत:ला सिद्ध करेल. तो चांगला फलंदाज आणि कर्णधार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी रहाणे घेईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.’
‘गुलाबी चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या दिवसरात्र कसोटी सामन्यात आमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे आव्हान असेल. गेल्या दौऱ्यापेक्षा यंदाचे आवाहन खडतर आहे. प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर वेगवेगळी आव्हाने असतात. भारतीय संघ नेहमीच विदेशात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत सतो,’ असेही कोहलीने सांगितले.
‘सध्याच्या भारतीय संघातील युवा शुभमान गिल याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली आहेत. तो एक प्रतिभावंत खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो कशाप्रकारे खेळतो, हे पाहण्यास मी इच्छुक आहे. पृथ्वी शॉ सराव सामन्यात अपयशी ठरला असला तरीही त्याच्याकडे कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे. मात्र तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळतोय. त्यामुळे या प्रतिभावान खेळाडूला संधी देऊ इच्छितो,’ या शब्दात कोहलीने पृथ्वीला खेळविण्याचे समर्थन केले.