ठळक मुद्देभारतीय संघ कसोटी सामन्यासाठी सज्ज ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय संघाला घाबरट वटवाघुळासारखा संबोधले6 डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरूवात
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. भारतीय संघाला मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबरोबरच मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचा सामना करावा लागणार आहे. याची सुरुवात भारतीय खेळाडू अॅडलेड येथे दाखल होताच झाली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने नेहमीच पाहुण्या संघावर टीका केली आहे. त्यांनी भारतीय संघावरही अशीच टीका केली. त्यांनी भारतीय संघ घाबरट वटवाघुळासारखा आहे, असे भाष्य केले. ऑस्ट्रेलियाच्या मीडियाच्या या टीकेवर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी प्रकट केली जात आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये एका वर्तमानपत्रात फोटो छापण्यात आला आहे. या फोटोमध्ये भारताचे रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार हे दोन खेळाडू आहेत. हा फोटो छापताना त्यावर ठळक अक्षरांमध्ये ' दी स्केर्डी बॅट्स' म्हणजेच घाबरट वघवाघुळ असे म्हटले गेले आहे.
ऑस्ट्रेलियन मीडियाने याआधीही भारतीय संघावर टीका केली आहे. 2017च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी कर्णधार
विराट कोहलीला ‘Donald Trump of Cricket’ असे संबोधले होते. अॅडलेड मैदानात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात यावा, अशी विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने बीसीसीआयला केली होती. पण बीसीसीआयने ही विनंती मान्य केली नाही. त्यामुळे भारतीय संघ हा अंधाराला घाबरतो, असा या साऱ्या प्रकरणाचा गर्भित अर्थ आहे, असेही म्हटले जात आहे.