ठळक मुद्देभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी 26 डिसेंबरपासून विराट कोहलीच्या आक्रमकतेवर ऑसी चाहत्यांची टीकाऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराने उडवली खिल्ली
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिका खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा मैदानावरील वर्तनामुळे गाजत आहे. पर्थ कसोटीत दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध झालेले पाहायला मिळाले. कर्णधार विराट कोहलीने ऑसी खेळाडूंना त्यांच्याचा भाषेत उत्तर दिले. कोहलीचे हे वागणं ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना आवडले नाही आणि त्यामुळेच त्याच्यावर टीका झाली. ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकाराने एक व्हायरल व्हिडीओ पोस्ट करून कोहलीची खिल्ली उडवली आहे.
या व्हिडीओत एक फलंदाज बाद झाल्यानंतर रागाने बॅट तोडताना दिसत आहे. त्याखाली त्याने कॅप्शन लिहिली की,''आपल्या मनासारखं घडलं नाही, तर असं वागायचं हे कोहली शिकवत आहे.''
पाहा व्हिडीओ...
कोहलीची खिल्ली उडवणाऱ्या पत्रकारावर नेटिझन्स चांगलेच संतापले आणि त्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.