Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS Test : ... अन् मोहम्मद शमीपुढे झुकला विराट कोहली

कोहली कोणापुढेही आपली मान झुकवणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:41 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा कर्णधार विराट कोहली आक्रमक असल्याचे साऱ्यांनाच माहिती आहे.प्रत्येकवेळी त्याने 'अरे ला का रे' असा जवाब दिली आहे.पण अशीच एक गोष्ट घडली की कोहलीला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीपुढे झुकावे लागले.

अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहली आक्रमक असल्याचे साऱ्यांनाच माहिती आहे. प्रत्येकवेळी त्याने 'अरे ला का रे' असा जवाब दिली आहे. त्यामुळे कोहली कोणापुढेही आपली मान झुकवणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल. पण अशीच एक गोष्ट घडली की कोहलीला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीपुढे झुकावे लागले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ सध्याच्या घडीला सराव करत आहेत. भारताच्या सरावादरम्यान कोहली शमीपुढे झुकल्याचे पाहायला मिळाले.

शमी हा भारताचे मुख्य अस्त्र ठरू शकतो. कारण तो फक्त वेगवान मारा करत नाही तर चेंडू स्विंगही त्याला उत्तमपद्धतीने करता येतात. त्याचबरोबर रीव्हर्स स्विंगही शमी चांगल्यारीतीने करतो. त्यामुळे कोहली नेट्समध्ये शमीच्या गोलंदाजीवर सराव करत होता. त्यावेळी शमीने असा एक बाऊन्सर टाकला की कोहलीला त्या चेंडूपुढे झुकावे लागले.

पाहा हा व्हिडीओ

 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता, परंतु कोहलीसाठी हा दौरा संस्मरणीय ठरला होता. त्याने त्या दौऱ्यात खोऱ्याने धावा केल्या होत्या आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होत आहे.

टॅग्स :विराट कोहलीमोहम्मद शामीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया