IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 25, 2020 01:57 PM2020-12-25T13:57:37+5:302020-12-25T13:59:49+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS team india for 2nd test against australia announced | IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11ची घोषणा; शुभमन गिल, मोहम्मद सिराजचे डेब्यू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देबीसीसीआयने टीम इंडियाच्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे.विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. यासामन्यातून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे कसोटी पदार्पन (Debut) करतील.

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसरा कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ शनिवारी मेलबर्नच्या मैदानावर उतरेल. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. चेतेश्वर पुजारा उप-कर्णधार असेल, तर ऋषभ पंत विकेटकीपर असेल. या शिवाय यासामन्यातून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज हे कसोटी पदार्पन (Debut) करतील.

असा असेल भारतीय संघ (प्लेइंग-11)-
अजिंक्या रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमन विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघ सध्या मेलबर्नमध्ये आहे. येथे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) पुन्हा एकदा म्हटले आहे, की उत्तर समुद्र किनाऱ्यावर कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असतानाही  भारत आणि आस्ट्रेलियादरम्यान खेळला जाणारा तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच (एससीजी) खेळवला जाईल. याच बरोबर, कोरोनामुळे सिडनीतील स्थिती अधिक बिघडल्यास ते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) तिसरा कसोटी सामना खेळविण्याचा विचार करत आहेत, असेही सीएने म्हटले आहे.

Web Title: IND vs AUS team india for 2nd test against australia announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.