Join us

IND vs AUS T20: सामन्यापूर्वी कोहलीने जिंकली चाहत्यांची मनं

IND vs AUS T20: भारतीय कर्णधार विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:11 IST

Open in App

ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय कर्णधार विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. भारतीय संघाच्या सराव सत्रातही अनेक चाहते केवळ कोहलीला पाहण्यासाठी तासनतास उभे राहिलेले दिसले. कोहलीनेही त्यांना निराश केले नाही. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोहलीने चाहत्यांसोबत फोटो काढले होते. त्याने या कृतीतून चाहत्यांना पुन्हा प्रेमात पाडले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कोहलीचा फॅन्सप्रती असलेले प्रेम पुन्हा दिसले.

ब्रिस्बनच्या गाबा स्टेडियमवर सुरू असलेल्या ट्वेंटी-20 सामना सुरू होण्यापूर्वी बरेच तास आधी चाहते भारतीय संघाला चिअर करण्यासाठी आले होते. त्यात कोहलीचे चाहते अधिक होते. सीमारेषेवर सराव करताना कोहलीचे चाहते त्याच्यासाठी चिअर करत होते. त्यावेळी कोहलीने त्याची हिरमोड केला नाही. त्याने चाहत्यांना ऑटोग्राफ देत त्यांची मनं जिंकली. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया