IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना अद्यापही सुरू न झाल्याने चाहत्यांचा संयम तुटत चालल्याचे पाहायला मिळतोय.. नागपूरात आज दिवसभर पाऊस पडला नसला तरी मैदान सुकवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळेच ६.३०, ७ आणि ८ वाजता अम्पायर्सकडून मैदानाची पाहणी केली गेली. आता ८.४६ ही नवी वेळ दिली गेलीय... त्यानंतर अम्पायर्सने हिरवा कंदील दिला तर ५-५ षटकांचा सामना होईल. पण, दिवसभर पाऊस न पडूनही सामना वेळेत का सुरू होत नाही, यावर अम्पायर्सनी महत्त्वाचे अपडेट्स दिले.
भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मागील तीन दिवस येथे पाऊस सतत सुरू असल्याने खेळपट्टी अजूनही हवी तशी सुकलेली नव्हती. सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती, परंतु अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली. ७ व ८ वाजता पुन्हा पाहणी झाली. तेव्हाही अम्पायर्स खेळपट्टीबाबत समाधानी दिसले नाही आणि त्यांनी दोन्ही कर्णधारांना बोलावून परिस्थितीबाबत सांगितले.
![]()
केएन अनंथपद्मनाभन आणि नितीन मेनन यांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यांच्यासोबत चौथा अम्पायर अनिल चौधरी हेही उपस्थित होते. खेळपट्टी ओली असल्याने खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर एकाही खेळाडूचे जखमी होणे संघाला महागात पडणारे ठरेल. त्यामुळे अम्पायर पूर्ण सहानिशा करताना दिसले. ८ वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर अम्पायर्सनी दोन्ही कर्णधारांशी संवाद साधला. आता पुन्हा ८.४५ वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाईल आणि ९.४६चा कट ऑफ टाईम ठरला. त्यानंतर ५-५ षटकांचा सामना खेळवण्यात येईल.
पाहा व्हिडीओ...
Web Title: IND vs AUS T20 2022 Live Match : "Still not safe for the players. It's wet underneath. We are looking at the safety of the players. Ground staff working their best": Umpires Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.