IND vs AUS Sunil Gavaskar Big Prediction About Virat Kohli And Rohit Sharma : छऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सर्वांच्या नजरा या भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार बॅटर विराट कोहलीवर होत्या. टी-२० पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हे दोन्ही दिग्गज आता फक्त वनडे सामन्यात खेळताना दिसणार आहेत. ७ महिन्यानंतर त्यांचा कमबॅक शो हा फ्लॉप ठरला. आधीच दोघांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत असताना त्यात आता जोडीच्या निराशजनक कामगिरीची भर पडली आहे. रोहित शर्मा पर्थच्या मैदानातील वनडे सामन्यात अवघ्या ८ धावा करून बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या विराट कोहलीवर ८ चेंडू खेळून शून्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. या दोघांच्या फ्लॉप शोनंतर लिटल मास्टर सुनील गावसकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. नेमकं गावसकर रोहित-विराटसंदर्भात काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराटसंदर्भात गावसकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले...
पहिल्या वनडेतील रोहित आणि विराटच्या फ्लॉप शोनंतर महान क्रिकेटपटू सुनील गावसकरांनी या दोन दिग्गजांसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या खास मुलाखतीत ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियात ही जोडी जिथं पहिला वनडे सामना खेळली ती खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. पर्थच्या खेळपट्टीवर उसळत्या चेंडूचा सामना करणं सोपी गोष्ट नाही. ज्यावेळी तुम्ही मोठ्या ब्रेकनंतर मैदानात उतरता त्यावेळी हा टास्क आणखी अवघड होऊन जातो. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्याही निभाव लागला नाही, असे सांगत गावसकरांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा बचाव केला. एवढेच नाही तर उर्वरित दोन सामन्यात दोघांच्या भात्यातून मोठी खेळी पाहायला मिळाली तर आश्चर्यचकित होऊ नका, असे म्हणत त्यांनी ही जोडी उर्वरित सामन्यात हिट शो देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
IND vs AUS : पराभवानंतर कोच गौतम गंभीर यांनी घेतली गिलची शाळा? व्हायरल फोटोमुळे रंगली चर्चा
नेट्समध्ये जितका वेळ घालवतील तेवढं फायद्याचं
भारतीय संघ सर्वोत्तम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली काही महिन्यांच्या अंतराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरले आहेत. ते जितके अधिक खेळतील, नेट्समध्ये अधिक वेळ घालवतील तेवढी त्यांना दमदार कामगिरी करण्यासाठी मदत होईल. त्यांना सूर गवसला की, भारतीय संघाला ३०० पार धावसंख्या उभारण्यापासून रोखता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
Web Summary : Rohit Sharma and Virat Kohli's comeback in the first ODI against Australia proved disappointing. Sunil Gavaskar defended them, citing challenging pitch conditions and predicted a strong comeback in the remaining matches if they spend more time in nets.
Web Summary : ऑस्ट्रेलिया के खिलाफ पहले वनडे में रोहित शर्मा और विराट कोहली की वापसी निराशाजनक रही। सुनील गावस्कर ने पिच की चुनौतीपूर्ण परिस्थितियों का हवाला देते हुए उनका बचाव किया और शेष मैचों में मजबूत वापसी की भविष्यवाणी की अगर वे नेट्स में अधिक समय बिताते हैं।