Join us

IND vs AUS: पर्थच्या खेळपट्टीबद्दल कोहलीने केले 'हे' विधान

पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. खेळपट्टीवर गवतही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही खेळपट्टी पाहिल्यावर एक विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 16:45 IST

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून पर्थच्या मैदानावर सुरु होणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीसाठी ओळखली जाते. खेळपट्टीवर गवतही ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने ही खेळपट्टी पाहिल्यावर एक विधान केले आहे.

कधीकधी एका विधानातून स्पष्टपणे काही कळत नाही. पण त्या विधानाचा अन्वयार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते समजू शकते. कोहलीने खेळपट्टी पाहिल्यावर असेच एक विधान केले आहे. त्यामधून जो बरेच काही अर्थ निघत आहेत.

पर्थची खेळपट्टी पाहून विराट म्हणाला की, " पर्थची खेळपट्टी मी पाहिली. ही खेळपट्टी पाहून मी थोडासा निराश आहे. पण त्यापेक्षा जास्त मला या खेळपट्टीवर खेळण्याची उत्सुकता जास्त आहे. "

पर्थच्या मैदानात पहिल्यांदाच उतरणार कोहलीभारताचा कर्णधार विराट कोहली 2013 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. कोहलीला पहिल्यांदा कर्णधारपद करण्याची संधी ऑस्ट्रेलियाच्याच दौऱ्यात मिळाली होती. या दौऱ्यात कोहलीने ६९२ धावांचा रतीब घातला होता. पण गेल्या दौऱ्यात एकही कसोटी सामना खेळवण्यात आला नव्हता. त्यामुळे आतापर्यंत एकदाही कोहली पर्थच्या खेळपट्टीवर कसोटी सामना खेळायला उतरलेला नाही.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया