IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!

Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 13:36 IST2025-10-24T13:34:32+5:302025-10-24T13:36:08+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: Rohit Sharma Set to Break Shahid Afridi 10-Year-Old World Record for Most Sixes in ODIs | IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!

IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने ७३ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीमुळे त्याने आपला फॉर्म परत मिळवल्याचे संकेत दिले. याचसोबत, रोहित शर्मा आता क्रिकेट जगतातील एका विश्वविक्रमाच्या अगदी उंबरठ्यावर उभा आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम सध्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. आफ्रिदीने आपल्या ३९८ सामन्यांच्या कारकिर्दीत ३५१ षटकार मारले आहेत. तो जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने ३५० पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. आफ्रिदी २०१५ मध्ये निवृत्त झाल्यापासून हा विक्रम अबाधित आहे. रोहित शर्माने आतापर्यंत २७५ एकदिवसीय सामन्यांत ३४६ षटकार मारले आहेत आणि तो सध्या या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिदीचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला फक्त ६ षटकारांची गरज आहे.

रोहितने आणखी चार षटकार मारल्यास, तो ३५० षटकार पूर्ण करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरेल. पाच षटकार मारल्यास, तो आफ्रिदीच्या ३५१ षटकारांच्या विक्रमाची बरोबरी करेलआणि सहावा षटकार मारताच, तो आफ्रिदीला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातला नंबर वन फलंदाज बनेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ९७ चेंडूत ७३ धावांची खेळी करताना दोन उत्तुंग षटकार मारले. पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बाकी आहे. क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा आहे की, रोहित शर्मा तिसऱ्या वनडेमध्ये मोठी आणि स्फोटक खेळी करेल आणि सोबतच शाहिद आफ्रिदीचा सुमारे १० वर्षांपूर्वीचा हा मोठा विश्वविक्रम मोडून नवा इतिहास रचेल.

Web Title : IND vs AUS: रोहित शर्मा की नजरें अफरीदी के छक्कों के रिकॉर्ड पर।

Web Summary : रोहित शर्मा की विस्फोटक फॉर्म उन्हें वनडे में शाहिद अफरीदी के सबसे ज्यादा छक्कों के रिकॉर्ड को तोड़ने के करीब लाती है। अफरीदी के 351 छक्कों को पार करने और नए 'सिक्सर किंग' बनने के लिए उन्हें सिर्फ छह और छक्कों की जरूरत है।

Web Title : Rohit Sharma eyes Afridi's sixes record in IND vs AUS series.

Web Summary : Rohit Sharma's explosive form brings him close to breaking Shahid Afridi's record for most sixes in ODIs. He needs just six more sixes to surpass Afridi's 351 sixes and become the new 'Sixer King.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.