Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : पृथ्वी शॉची पहिल्या कसोटीतून माघार, भारताला मोठा धक्का

भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी  शॉचे स्थान निश्चित मानले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 11:27 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी  शॉचे स्थान निश्चित मानले जात होते.वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले. ६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे.

सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली.

 

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया