IND vs AUS ODI Rohit Sharma Speaking Marathi At Airport Watch Viral Video : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाला आहे. १९ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियाला पोहचला असून तिथं त्याने कसून सरावही सुरु केल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात एका खास व्हिडिओची भर पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठे थांबू? पापाराझींसमोर रोहित शर्माची मराठीत 'बोलंदाजी'
Filmygyan नावाच्या सोशल मीडिया हँडेलवरून रोहित शर्माचा मुंबई विमानतळावरील एक खास शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात रोहित शर्मा पापारांझींसमोर मराठीत संवाद साधताना पाहायला मिळते. रोहित दादा, एक फोटो प्लिज अशी विनंती त्याच्याभोवती जमलेले पापाराझी या व्हिडिओत करतात. यावर रोहित शर्मा फोटोसाठी कुठं थांबू? असा प्रश्न विचारतो. त्याच्या या साधेपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचे दिसून येते.
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
८ महिन्यात टीम इंडियाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या, पण...
रोहित शर्मानं आपल्या नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करताना ८ महिन्यात टीम इंडियाला दोन आयसीसी स्पर्धा जिंकून देण्याचा खास विक्रम नोंदवला. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिल्यावर त्याने छोट्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. मग इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी त्याने कसोटीतूनही निवृत्तीचा निर्णय घेतला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार असल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तोच एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. पण बीसीसीआयने स्प्लिट कॅप्टन्सीचा (क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात वेगळे कर्णधार) मुद्दा पुढे करत त्याच्याऐवजी शुबमन गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवले.
चाहत्यांच्या मनात मात्र अजूनही रोहितच कॅप्टन
Rohit Sharma Viral Video
जरी तो खेळाडूच्या रुपात मैदानात उतरणार असला तरी चाहत्यांच्या मनात तो आजही कॅप्टनच आहे. मुंबई विमानतळावरील जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावर उमटणाऱ्या कमेंटमध्ये ते स्पष्ट दिसून येते. "साधा सरळ आपला दादा", "आपला कॅप्टन" अशा कमेंटच्या माध्यमातून चाहत्यांनी रोहितबद्दलची क्रेझ दाखवून दिली आहे.