Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS ODI : कॅप्टन कूल माहीचा मोठेपणा, 87 वर्षीय आजीची घेतली भेट, पाहा व्हिडीओ

IND vs AUS ODI: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग सर्व वयोगटात आपल्याला सापडेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 16:11 IST

Open in App
ठळक मुद्देमहेंद्रसिंग धोनी दणक्यात कमबॅक करण्यासाठी सज्जभारत-ऑस्ट्रेलिया पहिला वन डे सामना शनिवारी

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग सर्व वयोगटात आपल्याला सापडेल. एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून त्याने सर्वांना आपलेसं केलं आहे. सध्या तो कारकिर्दीत सातत्यपूर्ण कामगिरी झगडत असला तरी त्याची बॅट चांलगीच तळपेल, असा चाहत्यांना दृढ विश्वास आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वन डे मालिकेतील त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने या मालिकेतील कामगिरी धोनीसाठी निर्णायक ठरणार आहे. 

वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा जमायला सुरुवात झाली आहे. त्यातील एका चाहतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी सिडनी ग्राऊंडवर भारतीय संघ इनडोअर स्टेडियमवर सराव करत असताना ही चाहती तेथे दाखल झाली. एडिथ नॉर्मन असं तिचं नाव... या 87 वर्षांच्या आजी धोनीच्या डाय हार्ट फॅन आहेत. त्यामुळे त्याची भेट घेण्यासाठी त्या त्यांच्या मुलासह सिडनीत दाखल झाल्या. 

या आजींबद्दल समजताच धोनी सराव सत्र संपवून तातडीनं त्यांची भेट घेण्यासाठी बाहेर आला. 37 वर्षीय धोनीनं आजींशी भरपूर गप्पा मारल्या. पाहा व्हिडीओ... 

वन डे मालिकेसाठीचे संघऑस्ट्रेलिया : अॅरोन फिंच ( कर्णधार ) , जेसन बेहरेंडोर्फ, अॅलेक्स करी, पीटर हँड्सकोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जे रिचर्डसन, पीटर सिडल, बिली स्टॅनलेक, मार्कस स्टोइनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, मिचेल मार्श.भारत : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.  

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया