Michael Hussey on Sachin Tendulkar : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकेल हसी याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांसह विक्रमादित्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरपेक्षा मी अधिक धावा काढल्या असत्या, असे वक्तव्य ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सचिनच्या विक्रमाच्या जवळपासही कोणी दिसत नाही, पण हा भाऊ म्हणतो मी...
क्रिकेट जगतातील महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरनं १९८९ ते २००१३ या मोठ्या कारकिर्दीत ६६४ सामन्यातील ७८२ डावात ३४ हजार ३५७ धावा काढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांसह १०० शतकांसह तो शतकाचा बादशहा ठरला आहे. सचिनच्या या विक्रमाच्या जवळपासही कोणी दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं हा विक्रम मोडीत काढत त्याच्यापेक्षा ५००० अधिक धावा सहज केल्या असत्या असे ऑस्ट्रेलियन दिग्गजाने म्हटले आहे. जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला? सचिनच्या तुलनेत तो किती मागे राहिला? यासंदर्भातील सविस्तर माहिती
IND vs AUS : जिथं सचिन ठरला फुसका बार; तिथं धोनी-कोहलीनं केलाय धमाका! इथं पाहा खास रेकॉर्ड
नेमकं काय म्हणाला मायकेल हसी?
'द ग्रेड क्रिकेटर' नावाच्या युट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये मायकेल हसी म्हणाला की, माझ्या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात अनेक प्रतिभावंत खेळाडू होते. त्यामुळे मला पदार्पणाच्या संधीसाठी खूप प्रतिक्षा कराी लागली. जर मला लवकर पदार्पणाची संधी मिळाली असती तर मी निश्चितच सचिन तेंडुलकर पेक्षा ५००० अधिक धावा काढल्या असत्या, असे मला नेहमी वाटते.
कशी राहिलीये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची कारकिर्द?
वयाच्या २८ व्या वर्षी ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणाऱ्या मायकेल हसी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३२४ डावात २२ शतकांसह ७२ अर्धशतकाच्या मदतीने १२ हजार ३९८ धावा केल्या आहेत. हसी हा ऑस्ट्रेलियातील महान क्रिकेटरपैकी एक आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात २७३ सामन्यात ६१ शतकांसह जवळपास २३ हजार धावांची नोंद आहे.
हा दावा म्हणजे वायफळ बडबडच! ही आकडेवारी त्याचा पुरावा
पदार्पणाची संधी मिळाल्यावर मायकेल हसी सातत्याने संघाचा भाग राहिला. पण तो सचिन तेंडुलकरच्या जवळपासही दिसत नाही. तेंडुलकर आणि हसी यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकाची तुलना केली तर दोघांच्या ७८ शतकांचे अंतर आहे. तेंडुलकरनं आपल्या मोठ्या कारकिर्दीत हसीपेक्षा ४५० डाव अधिक खेळले ही गोष्ट खरी आहे. पण तरीही त्याचा हा दावा पोकळ ठरतो. कारण सचिन तेंडुलकरपेक्षा ५००० धावा अधिक केल्या असत्या असं म्हणणाऱ्या हसीनं (१२३९८) आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सचिन तेंडुलकरनं जेवढ्या धावा केल्या आहेत त्याच्या निम्म्या धावाही केलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील हेडन याने हसीपेक्षा कमी सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा गाठला. पण हसीला ३०२ सामने खेळून १२ हजार ३९८ धावांपर्यंतच मजल मारता आली. ही आकडेवारी त्याचा दावा वायफळ बडबड असल्याचे ठरवते.