Join us

IND vs AUS: कोहली जमिनीवर बसून जेवायला लागला आणि...

त्यावेळी खास बिर्याणीचा बेत आखला होता. खेळाडूंनीही यावेळी बिर्याणीचा मनमुराद आस्वाद लुटला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 20:53 IST

Open in App

अ‍ॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या बाबतीत एक किस्सा असा घडला आहे की, तुम्हाला तो माहिती नसावा. एकदा कोहली एका खेळाडूच्या घरी जेवायला गेला होता. त्यावेळी कोहलीने चक्क जमिनीवर बैठक मारली आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कोहली जसा व्यायाम करून फिट मारण्याचा प्रयत्न करतो, तसा तो खाण्याच्या बाबतीतही तेवढाच सजग असतो. आता एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाल्यावर कोहली डाईटवर लक्ष ठेवून असतो. पण एकदा कोहलीने एका खेळाडूच्या जाऊन चक्क बिर्याणीवर ताव मारला होता.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाला दोन दिवसांनी प्रवास करावा लागतो. त्यावेळी खेळाडूंना घरेच जेवण मिळत नाही. त्यामुळे एकदा एका खेळाडूने आयपीएलमधल्या संघाला घरी जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी खास बिर्याणीचा बेत आखला होता. खेळाडूंनीही यावेळी बिर्याणीचा मनमुराद आस्वाद लुटला.

ही गोष्ट आहे गेल्या वर्षीची. कोहली आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार आहे. गेल्यावर्षी कोहलीसह संघातील खेळाडू मोहम्मद सिराजच्या घरी जेवायला गेले होते. बिर्याणी समोर आल्यावर कोहली थेट जमिनीवर बसला आणइ बिर्याणीचा आस्वाद लुटला. कोहलीला जमिनीवर बसल्याचे पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. पण कोहलीनंतर बंगळुरुच्या संपूर्ण संघाने जमिनीवर बसून जेवणाचा आनंद लुटला.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया