IND vs AUS : अनुष्का, अथिया यांच्याबद्दल हरभजन नकळत हे काय बोलून बसला, सोशल मीडियावर चर्चा 

icc odi world cup 2023 final : विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 21:21 IST2023-11-19T21:20:29+5:302023-11-19T21:21:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS indian Fans slam Harbhajan Singh for his funny remarks on Anushka Sharma and Athiya Shetty during ODI World Cup 2023 Final commentary | IND vs AUS : अनुष्का, अथिया यांच्याबद्दल हरभजन नकळत हे काय बोलून बसला, सोशल मीडियावर चर्चा 

IND vs AUS : अनुष्का, अथिया यांच्याबद्दल हरभजन नकळत हे काय बोलून बसला, सोशल मीडियावर चर्चा 

ind vs aus final | अहमदाबाद : अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकवटली. वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात असताना भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग त्याच्या एका विधानावरून चाहत्यांच्या निशाण्यावर आला. खरं तर भज्जी विश्वचषकात स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करत आहे. फायनलचा सामना पाहण्यासाठी भारतीय खेळाडूंच्या पत्नी देखील प्रेक्षक गॅलरीत दिसल्या. याचा दाखला देत हरभजने टिप्पणी करताच सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल भज्जी बोलत होता. लक्षणीय बाब म्हणजे अथिया आणि अनु्ष्का यांना क्रिकेटबद्दल किती कळते याबद्दल प्रश्न उपस्थित करून भज्जी वादाच्या भोवऱ्यात सापडला. भज्जीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून भारतीय चाहते त्याच्यावर निशाणा साधत आहेत. 

हरभजन वादाच्या भोवऱ्यात 
भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींबद्दल बोलताना भज्जीने म्हटले, "मी याचाच विचार करतोय की त्या क्रिकेटबद्दल बोलत आहेत की कोणत्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे... कारण की मला वाटते की, त्यांना क्रिकेटबद्दल किती माहिती असावी हे ठाऊक नाही. त्या क्रिकेटबद्दलच भाष्य करत असतील असे मला वाटत नाही, त्यांना याबद्दल किती कळते याबाबत शंका आहे." दरम्यान, हरभजन सिंगच्या या विधानाचा दाखला देत चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला लक्ष्य करत आहेत.

Web Title: IND vs AUS indian Fans slam Harbhajan Singh for his funny remarks on Anushka Sharma and Athiya Shetty during ODI World Cup 2023 Final commentary