Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : भारतीय संघाने केली सरावाला धडाक्यात सुरुवात

काही दिवसांमध्ये भारताच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पुढे आले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही भारताला या गोष्टीचा फटका बसला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 22:18 IST

Open in App
ठळक मुद्देभारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा गंभीरपणे घेतला असून त्यांनी धडाक्यात सरावाला सुरुवात केली आहे. भारताच्या संघाने गाबाच्या मैदानावर सराव करताना चांगलाच घाम गाळला.ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने भारताच्या सरावाला भेट दिली.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा गंभीरपणे घेतला असून त्यांनी धडाक्यात सरावाला सुरुवात केली आहे. भारताच्या संघाने गाबाच्या मैदानावर सराव करताना चांगलाच घाम गाळला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने भारताच्या सरावाला भेट दिली. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर गिलख्रिस्टने चर्चाही केली.

काही दिवसांमध्ये भारताच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पुढे आले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही भारताला या गोष्टीचा फटका बसला होता. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांकडून यावेळी फलंदाजीचा सराव करून घेतला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी फलंदाजीचा चांगलाच सराव केला.

हा पाहा व्हीडीओ

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली