Join us

IND vs AUS: बुमराहकडे मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी; आतापर्यंत एकच भारतीय करू शकला 'असं'!

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्‍या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहकडे मोठा विक्रम रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:10 IST

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे वाया गेला. तर, दुसरा टी-२० सामना ३१ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे मोठा विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने चार विकेट्स घेतल्यास तो  टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सचा टप्पा पूर्ण करेल. आतापर्यंत भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला भारतासाठी १०० विकेट्स मिळवता आल्या आहेत. लवकरच या यादीत जसप्रीत बुमराहचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. 

जसप्रीत बुमराहने २०१६ मध्ये भारतीय संघासाठी टी-२० मध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ७६ टी-२० सामन्यांमध्ये एकूण ९६ विकेट्स घेतल्या आहेत. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात त्याने दमदार गोलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने एकूण १५ विकेट्स घेत विरोधी संघांचे कंबरडे मोडले.

भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स

गोलंदाजसामने विकेट्स
अर्शदीप सिंग ६५१०१
हार्दिक पांड्या १२०९८
जसप्रीत बुमराह ७६९६
युजवेंद्र चहल ८०९६
भुवनेश्वर कुमार८७९०

अर्शदीप सिंगला संधी मिळण्याची शक्यता

पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा या दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिली. तथापि, मेलबर्नची खेळपट्टी नेहमीच वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. अशा परिस्थितीत तो तीन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकतो आणि अर्शदीप सिंगलाही प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. अलिकडच्या काळात, अर्शदीप आणि बुमराहच्या जोडीने अनेक सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा टी-२० संघ:

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित शर्मा आणि हर्षित शर्मा.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs AUS: Bumrah eyes record; only one Indian achieved it!

Web Summary : Jasprit Bumrah needs four wickets in the next T20 against Australia to reach 100 T20I wickets. Arshdeep Singh is the only Indian pacer to achieve this milestone. Bumrah has 96 wickets in 76 matches. Arshdeep may also get a chance in the playing eleven.
टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअर्शदीप सिंगहार्दिक पांड्याऑफ द फिल्ड