IND vs AUS : विराट कोहलीचा नवीन लूक तुम्ही पाहिलात का...

Zero' हा चित्रपट पाहिल्यानंतर कोहलीने आपला नवीन लूक केला असल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 14:21 IST2018-12-23T14:21:07+5:302018-12-23T14:21:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: Do you see Virat Kohli's new look? | IND vs AUS : विराट कोहलीचा नवीन लूक तुम्ही पाहिलात का...

IND vs AUS : विराट कोहलीचा नवीन लूक तुम्ही पाहिलात का...

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला लूक बदलला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराट ऑस्ट्रेलियामध्ये सध्या पत्नी अनुष्का शर्माबरोबर काही वेळ व्यतित करत आहे. या दोघांनी शाहरुख खान, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर कोहलीने आपला नवीन लूक केला असल्याचे म्हटले जात आहे.

चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 'बॉक्सिंग डे' कसोटीचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत. तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू रविवारपासून सरावाला सुरुवात करणात आहेत. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. 


Web Title: IND vs AUS: Do you see Virat Kohli's new look?