Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS : धोनी, रोहित आणि केदार जाधव निघाले ऑस्ट्रेलियाला

धोनी, रोहित आणि केदार आज दुपारी साडे बारानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानामध्ये बसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:03 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला. आता एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ कंबर कसणार आहे. या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि केदार जाधव ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेसाठी धोनी, रोहित आणि केदार आज दुपारी साडे बारानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानामध्ये बसले. यावेळी केदारने एक फोटो काढला असून त्याने तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

कसोटी मालिका विजयानंतर कोहलीने केला भांगडा

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंह धोनीरोहित शर्माकेदार जाधव