IND vs AUS : धोनी, रोहित आणि केदार जाधव निघाले ऑस्ट्रेलियाला

धोनी, रोहित आणि केदार आज दुपारी साडे बारानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानामध्ये बसले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:03 IST2019-01-07T20:02:15+5:302019-01-07T20:03:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: Dhoni, Rohit and Kedar Jadhav leave for Australia | IND vs AUS : धोनी, रोहित आणि केदार जाधव निघाले ऑस्ट्रेलियाला

IND vs AUS : धोनी, रोहित आणि केदार जाधव निघाले ऑस्ट्रेलियाला

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला. आता एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ कंबर कसणार आहे. या मालिकेसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि केदार जाधव ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.

ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 12 जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेसाठी धोनी, रोहित आणि केदार आज दुपारी साडे बारानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी विमानामध्ये बसले. यावेळी केदारने एक फोटो काढला असून त्याने तो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.


 

कसोटी मालिका विजयानंतर कोहलीने केला भांगडा



 

Web Title: IND vs AUS: Dhoni, Rohit and Kedar Jadhav leave for Australia