Join us  

IND vs AUS : चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाला दिला इशारा; सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांना न जमलेला विक्रम नोंदवला  

India vs Australia Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघामध्ये चेतेश्वर पुजाराचा फॉर्म पाहून घबराटीचे वातावरण पसरले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 4:35 PM

Open in App

India vs Australia Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघामध्ये चेतेश्वर पुजाराचा फॉर्म पाहून घबराटीचे वातावरण पसरले आहे. टीम इंडियाचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज पुजाराने शुक्रवारी असा एक प्रकार केला की, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन टीम हैराण झाली आहे. ऑस्ट्रेलियाला ९ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पुजाराने आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत मोठा विक्रम केला आहे. पुजारा हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी मालिकेतील सर्वात मोठी डोकेदुखी ठरला होता आणि त्याचा फॉर्म परतणे ही कांगारूंसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

मोठी बातमी : दुसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाला ICC ने दिला दणका; रोहित शर्मावर बंदीची टांगती तलवार 

रणजी करंडक स्पर्धेत खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराने भारतात १२ हजार प्रथम श्रेणी धावा पूर्ण करून इतिहास रचला आहे. चेतेश्वर पुजाराने भारतात १२ हजार प्रथम श्रेणी धावा करत एक मोठा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाजही हा पराक्रम करू शकलेले नाहीत. चेतेश्वर पुजाराच्या आधी वासिफ जाफरने हा पराक्रम केला आहे. वासिफ जाफरने भारतात १४६०९ प्रथम श्रेणी धावा नोंदवल्या आहेत. 

आंध्र प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी करंडक २०२२-२३ सामन्यात सौराष्ट्रकडून खेळताना पुजाराने हा विक्रम केला. या सामन्यात शानदार फलंदाजी करताना पुजाराने ९१ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने २४० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५६ शतकं आणि ७३ अर्धशतकांसह १८४२२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. पुजाराने भारतासाठी ९८ कसोटी सामने खेळले असून ४४.३९च्या सरासरीने ७०१४ धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सामने:

  • पहिली कसोटी, ९-१३ फेब्रुवारी, सकाळी ९.३०, नागपूर   
  • दुसरी कसोटी, १७-२१ फेब्रुवारी, सकाळी ९.३०, दिल्ली
  • तिसरी कसोटी, 1-5 मार्च, सकाळी 9.30, धर्मशाळा
  • चौथी कसोटी, 9-13 मार्च, सकाळी 9.30, अहमदाबाद

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :चेतेश्वर पुजाराभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावासिम जाफररणजी करंडक
Open in App