Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs AUS: तब्बल 31 वर्षांनी विराटसेनेने ऑस्ट्रेलियात जे केलं ते कुणालाही जमलं नाही

भारताने ऑस्ट्रेलियाला रविवारी फॉलोऑन दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 13:16 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट सेना सध्या भन्नाट फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मालिका त्यांनी जळपास खिशात टाकली आहे. या गोष्टीवर उद्या शिक्कामोर्तब होईल. पण हे शिक्कामोर्तब होण्याआधीच विराटसेनेने रविवारीच ऑस्ट्रेलियाची लक्तर वेशीवर टांगली आहेत.

पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलोऑन खेळण्यास भाग पाडले आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाला रविवारी फॉलोऑन दिला. ऑस्ट्रेलियावर तब्बल 31 वर्षांनी त्यांच्यावर घरच्या मैदानात फॉलोऑनची नामुष्की ओढवली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानात 1988 साली फॉलोऑन मिळाला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीकुलदीप यादव