Join us

अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

यंदाच्या वर्षात धमाक्यावर धमाका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 18:21 IST

Open in App

Abhishek Sharma Destroys Rohit Sharma And Shikhar Dhawan's T20I Record : भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सातत्याने आपल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर एकापाठोपाठ एक विक्रम रचताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने फक्त १६ चेंडू खेळले. पण या खेळीत २५ धावा करत त्याने हिटमॅन रोहित शर्मासह भारताचा माजी सलामीवीर शिखऱ धवन याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

अभिषेक शर्मानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमाला गवसणी घातली आहे. एका वर्षात ७०० धावा करणारा तो पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. हा विक्रम प्रस्थापित करताना त्याने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि  शिखर धवन या जोडीला मागे टाकले आहे.  शिखर धवन याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलामीवीराच्या रुपात भारताकडून खेळताना ६८९ धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे. रोहित शर्मानं २०२२ मध्ये ६४९ धावा केल्या होत्या.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेक शर्माचा 'वन मॅन शो', मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडला!

यंदाच्या वर्षात धमाक्यावर धमाका! 

२५ वर्षीय अभिषेक शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर  भारतीय टी-२० संघाचा प्रमुख फलंदाज बनला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीतील सर्वोच्च रेटिंगचा विक्रमही त्याच्या नावे आहे. २०२४ च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याची कामगिरी घसरली होती. पण २०२५ मध्ये त्याने धमाकेदार अंदाजात कमबॅक करत छोट्या फॉरमॅटमध्ये धमाक्यार धमाका करताना पाहायला मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्या भात्यातून ५४ चेंडूत १३५ धावांची वादळी खेळी आली होती. आशिया कप स्पर्धेत ३१४ धावा करत त्याने मोठा विक्रम सेट केला होता. टी-२० आशिया कप स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावांसह २०० च्या स्ट्राइक रेटसह त्याने इतिहास रचला होता. यात आता एका वर्षांत ७०० धावांसह त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma Breaks Records, Surpasses Rohit & Dhawan in T20s

Web Summary : Abhishek Sharma set a new T20I record, surpassing Rohit Sharma and Shikhar Dhawan. He became the first Indian to score 700 runs in a calendar year, showcasing his explosive batting and solidifying his position in the Indian T20 team.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअभिषेक शर्मारोहित शर्माशिखर धवन