Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 4th Test : चेतेश्वर पुजाराचा डान्स पाहून कोहलीला हसू आवरले नाही, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 4th Test:भारतीय संघाने 2019 या वर्षाची सुरुवात दणक्यात केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 15:56 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय521 धावा करणारा चेतेश्वर पुजारा मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने 2019 या वर्षाची सुरुवात दणक्यात केली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला. 1947 पासून भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली नव्हती आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने ते करून दाखवलं. या मालिकेत तीन शतकांसह सर्वाधिक 521 धावा करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, पुजाराला मालिका विजयाचे आणि मालिकावीर पुरस्काराचा आनंद साजरा करता आला नाही.

ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू बेभान होऊन डान्स करत होता, परंतु लाजाळू पुजारा असे सेलिब्रेशन करू शकला नाही. पण, त्याने सहकाऱ्यांच्या आग्रहानंतर डान्स करण्याचा प्रयत्न नक्की करून पाहिला. त्याचा डान्स पाहून कोहलीला हसू आवरता आले नाही. त्याच्या या नृत्याला रिषभ पंतने पुजारा डान्स असे नावही दिले. पाहा व्हिडीओ.. पुजाराला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्या तो म्हणाला, ''मी आतापर्यंत खेळलेला हा सर्वोत्तम संघ होता. गोलंदाजांचे अभिनंदन. 20 विकेट घेणे सोपी गोष्ट नाही. आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे.'' 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचेतेश्वर पुजाराविराट कोहली