Join us

IND vs AUS, 4th Test : रिषभ पंत नसल्याचा संघाला मोठा फटका; अहमदाबाद कसोटीपूर्वी रोहित शर्माने व्यक्त केली खंत, KS Bharat बाबत विधान

India vs Australia, 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शेवटची कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ मार्चपासून खेळवली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 15:15 IST

Open in App

India vs Australia, 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची शेवटची कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ मार्चपासून खेळवली जाईल. या कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने पत्रकारांशी संवाद साधला.  यावेळी त्याने यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा ( Rishabh Pant) उल्लेख केला. भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटींत विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती, परंतु स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली तिसरी कसोटी जिंकून भारताचा डाव उलटवला. आता चौथ्या कसोटीत भारताला विजय मिळवणे गरजेचे आहे, कारण तसे न झाल्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याच्या स्वप्नांना धक्का बसू शकतो. इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने WTC Final मधील आपले स्थान पक्के केले आहे. 

सुर्याला पुन्हा देणार संधी?; ३ खेळाडूंना मिळू शकतो डच्चू, अशी असू शकते भारताची Playing XI

रोहित शर्मा म्हणाला की, अहमदाबाद कसोटी पाहण्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान येत आहेत, हा एक अविस्मरणीय क्षण असेल. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. तुम्ही कोणतीही कसोटी खेळा, त्यातील परिस्थिती सोडा, धावा काढण्याचे मार्ग शोधा, याचाच विचार आम्ही करतोय. त्यामुळे तुम्ही जिथे खेळता तिथे धावा काढण्याचा मार्ग शोधा. तीन आठवड्यात फारसा बदल होऊ शकत नाही. तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार करावे लागेल.गेल्या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही, त्यामुळे आम्ही सामना गमावला.

रिषभचा कार अपघात झाला आणि त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. जवळपास ६-७ महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे आणि त्यामुळे तो आयपीएल २०२३ ही खेळणार नाही. रिषभ पंतबाबत कर्णधार रोहित म्हणाला की, रिषभ पंतची संघात अनुपस्थिती ही टीम इंडियाची मोठी चूक आहे. त्याने बॅटने भारतासाठी खूप काही केले आहे. या आव्हानात्मक खेळपट्टींवरील कामगिरीवर केएस भरतचा खेळाची मोजमाप करायला नहो. त्याला काही वेळ द्यायला हवा. मी त्याला चिंता करू नको असे सांगितले आहे. त्याच्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच वेळ आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्मारिषभ पंत
Open in App