Join us  

Ind vs Aus 4th test: मयंक अग्रवालने फलंदाजीसाठी दिले 'या' महान क्रिकेटपटूला श्रेय

सिडनी येथे सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मयंकने 77 धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 8:15 PM

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा युवा सलामीवीर मयंक अग्रवालने दुसऱ्याच सामन्यात माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्याशी बरोबरी केली आहे. आपल्या या पराक्रमाचे श्रेय मयंकने एका माजी महान क्रिकेटपटूला दिले आहे.

मयांकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 72 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर सिडनी येथे सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मयंकने 77 धावांची खेळी साकारली.

 

मयंकने सांगितले की, " राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना मला बराच फायदा झाला. द्रविड यांनी फलंदाजीचे तंत्र माझ्याकडून घोटवून घेतले. त्याचबरोबर कोणत्या परिस्थितीमध्ये कसा खेळ करायचा, हे त्यांनी आम्हाला शिकवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आणि माझ्याकडून चांगल्या धावा होत राहील्या. त्यामुळे द्रविड यांना माझ्या चांगल्या फलंदाजी श्रेय देईन. " 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराहूल द्रविड