Join us

Ind vs Aus 4th test live: ...तरीही ८ तास ४० मिनिटे 'देशासाठी' मैदानावर लढला; विराट कोहलीला नेमकं काय झालेलं याचा खुलासा झाला

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) अहमदाबाद कसोटीचा चौथा दिवस गाजवला. विराटने ८ तास ४० मिनिटे फलंदाजी करताना  ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 20:42 IST

Open in App

India vs Australia 4th test live score updates : विराट कोहलीने ( Virat Kohli) अहमदाबाद कसोटीचा चौथा दिवस गाजवला. विराटने ८ तास ४० मिनिटे फलंदाजी करताना  ३६४ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने १८६ धावा केल्या. सामन्यानंतर विराट आजारी असल्याचे पत्नी अनुष्का शर्माने सोशल मीडियावर लिहिले अन् विराटप्रती चाहत्यांच्या मनातील आदर आणखी वाढला. पण, विराटला नेमकं काय झालं होतं आणि तरीही तो जवळपास ९ तास खेळपट्टीवर देशासाठी उभा राहिला, हे जाणून तो अभिमान आणखी वाढेल.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला रवींद्र जडेजाने ( २८) विकेट फेकली. त्यानंतर विराटने मोर्चा सांभाळला. श्रेयस अय्यर कंबरेच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, याची कल्पना विराटला होती आणि त्यामुळेच त्याने एक अनुभवी खेळी केली.  विराट व केएस भारत ( ४४) यांनी ८४ धावांची भागीदारी केली. विराट व अक्षर यांनी सहाव्या विकेटसाठी २१५ चेंडूंत १६२ धावांची भागीदारी केली. अक्षर ११३ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७९ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव ५९१ धावांवर गडगडला.

विराटच्या या खेळीनंतर अनुष्काने इस्टाग्राम स्टोरी लिहिली, ''आजारपण असूनही तू शांत राहून ही अविस्मरणीय खेळी केलीस. हे मला नेहमी प्रेरणा देत राहिल.'' ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद ३ धावा केल्या आणि अजूनही ते ८८ धावांनी पिछाडीवर आहेत. केेएस भरत आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडून दोन झेल सुटले अन्यथा ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट झाली असती. अनुष्काने विराटला नेमकं काय झालं हे  सांगितलं नव्हतं अन् याचा खुलासा आर अश्विनची पत्नीच्या इस्टा स्टोरीवरून झाला. विराट तापाने फणफणला होता आणि तरीही तो मैदानावर ८ तास ४० मिनिटे खेळत राहिला. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली
Open in App