Join us

अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी

अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरची अति सुंदर गोलंदाजी, पठ्ठ्यानं ८ चेंडूत साधला ३ विकेट्स घेण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 17:32 IST

Open in App

IND vs AUS 4th T20I  : भारतीय संघाने गोल कॉस्ट येथील कॅराराच्या मैदानात कांगारुंची शिकार करत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघ ऑस्ट्रेलियन मैदानातील ही मालिका गमावणार नाही, हे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने १६७ करत यजमान ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १९ व्या षटकात ११९ धावांत आटोपला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियाकडून फलंदाजीत शुभमन गिलनं केली सर्वोच्च धावसंख्या

 गोल को्स्ट येथील कॅराराच्या मैदानात भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मानं भारतीय संघाच्या डावाची सुरुात केली. स्फोटक बॅट अभिषेक शर्मा २१ चेंडूत २८ धावा करून परतल्यावर शुबमन गिलं ३९ चेंडूत ४६ धावांची उपयुक्त आणि संघाकडून सर्वोच्च खेळी केली. त्याने केलेली ही खेळी दोन्ही संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली.  अखेरच्या षटकात अक्षर पटेलनं ११ चेंडूत २१ धावा करत संघाच्या धघावफलकावर निर्धारित २० षटकात ८ बाद १६७ धावा लावल्या होत्या.

Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...

गोलंदाजीवेळी अक्षर पटेल, शिवम दुबेसह अखेरच्या षटकात वॉशिंग्टनचा जलवा!

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना अक्षर पटेल गोलंदाजीला आला. त्याने पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. मॅथ्यू  १९ चेंडूत २५ धावा करत तंबूत परतला. शिवम दुबेनं मितेल मार्शच्या रुपात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. तो २४ चेंडूत ३० धावा करून माघारी फिरला. जोश इंग्लिसला  क्लीन बोल्ड करत अक्षरनं आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. मिचेल मार्श वगळता अन्य कोणत्याही ऑस्ट्रेलियन बॅटरला भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. या सामन्यातून संघात कमबॅक करणारा ग्लेन मॅक्सवेल हा देखील फुसका बार ठरला. वरुण चक्रवर्तीनं त्याची विकेट घेतली. अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादव याने वॉशिंग्टनच्या हातात चेंडू सोपवल्याचे पाहायला मिळाले. या पठ्यानं आपल्या पहिल्याच षटकात २ चेंडूवर २ विकेट्स घेत हॅटट्रिकवर पोहचला होता. हा डाव साध्य झाला नसला तरी दुसऱ्या षटकातील आणखी एक विकेट्स घेत त्याने ८ चेंडूत ३ विकेट्सचा डाव साधला. बुमराहनं या शामन्यात एक विकेट आपल्या खात्यात जमा केली असून टी-२० मध्ये त्याच्या खात्यात आता ९९ विकेट्स जमा झाल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Washington Sundar's 3 Wickets in 8 Balls! India Leads Series.

Web Summary : India defeated Australia by 48 runs, securing a 2-1 series lead. Washington Sundar's brilliant bowling and disciplined pace attack restricted Australia to 119. Team India's victory ensures they cannot lose the series, with the next match in Brisbane.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया