IND vs AUS 4th T20I : भारतीय संघाने गोल्ड कोस्ट येथील कॅराराच्या मैदानात कांगारुंची शिकार करत ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघ ऑस्ट्रेलियन मैदानातील ही मालिका गमावणार नाही, हे चित्रही स्पष्ट झाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने १६७ धावा करत यजमान ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ १९ व्या षटकात ११९ धावांत आटोपला. भारतीय संघाने ४८ धावांनी सामना जिंकत सलग दुसऱ्या विजयासह मालिकेत आघाडी घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियाकडून फलंदाजीत शुभमन गिलनं केली सर्वोच्च धावसंख्या
गोल्ड को्स्ट येथील कॅराराच्या मैदानात भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. स्फोटक बॅट अभिषेक शर्मा २१ चेंडूत २८ धावा करून परतल्यावर शुबमन गिलं ३९ चेंडूत ४६ धावांची उपयुक्त आणि संघाकडून सर्वोच्च खेळी केली. त्याने ही खेळी दोन्ही संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलनं ११ चेंडूत २१ धावा करत संघाच्या धावफलकावर निर्धारित २० षटकात ८ बाद १६७ धावा लावल्या होत्या.
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
गोलंदाजीवेळी अक्षर पटेलच्या फिरकीसह शिवम दुबेची सर्वोत्तम कामगिरी
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली . ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना अक्षर पटेल गोलंदाजीला आला. त्याने पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. मॅथ्यू शॉर्ट १९ चेंडूत २५ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर शिवम दुबेनं मिचेल मार्शच्या रुपात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. ऑस्ट्रेलियन कर्णधार २४ चेंडूत ३० धावा करून माघारी फिरला. जोश इंग्लिसला क्लीन बोल्ड करत अक्षरनं आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. मिचेल मार्श वगळता अन्य कोणत्याही ऑस्ट्रेलियन बॅटरला भारतीय गोलंदाजांसमोर तग धरता आला नाही. या सामन्यातून संघात कमबॅक करणारा ग्लेन मॅक्सवेल हा देखील फुसका बार ठरला. वरुण चक्रवर्तीनं त्याची विकेट घेतली.
अखेरच्या षटकात वॉशिंग्टनचा जलवा!
अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादव याने वॉशिंग्टनच्या हातात चेंडू सोपवल्याचे पाहायला मिळाले. या पठ्यानं आपल्या पहिल्याच षटकात २ चेंडूवर २ विकेट्स घेत हॅटट्रिकवर पोहचला होता. हा डाव साध्य झाला नसला तरी दुसऱ्या षटकातील आणखी एक विकेट्स घेत त्याने ८ चेंडूत ३ विकेट्सचा डाव साधला. बुमराहनं आणि अर्शदीप या दोघांनी या सामन्यात प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.