मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने पहिल्या डाव 7 बाद 443 धावांवर घोषित करून यजमान ऑस्ट्रेलियासमोर मोठं आव्हान उभं केलं. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजांनी भंबेरी उडवली. उपाहारापर्यंत त्यांचे चार फलंदाज माघारी पाठवून भारताने सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. जसप्रीत बुमराने कांगारूंना सळो की पळो करून सोडलं. त्यात उपाहारानंतरही भारतीय गोलंदाजांनी धक्कासत्र कायम राखले. पण, या सामन्यात जसप्रीत बुमराच्या Stunning चेंडूने सर्वांची वाहवा मिळवली. उपाहाराला जाण्यापूर्वी अखेरच्या षटकार बुमराने शॉन मार्शला यॉर्कर टाकला आणि त्यावर तो पायचीत होऊन माघारी परतला.
पाहा व्हिडीओ..
बुमराच्या त्या चेंडूचे नेटिझन्सकडून कौतुक झाले.