Join us

IND vs AUS 3rd Test: कोहलीला Zero चं प्रमोशन पडलं महागात, संघातील झीरोकडे लक्ष देण्याचा सल्ला

IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 13:35 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पत्नी अनुष्का शर्मासोबत 'Zero' हा चित्रपट पाहिला. कोहलीने या चित्रपटातील सर्व कलाकारांचे आणि विशेष म्हणजे अनुष्काच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. कोहलीने ट्विट केले की, 'झिरो चित्रपट खूप चांगला आहे. या चित्रपटाने पूर्ण मनोरंजन केले आहे. मला खूप आवडला. सर्वच कलाकारांनी खूप चांगले काम केले आहे. अनुष्काचे काम फार आवडले. तिचे पात्र हे आव्हानात्मक होते. तरीही तिने ते चांगल्या पद्धतीने साकारले आहे.’ 

कोहलीने याआधीही अनुष्काच्या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. 'झिरो' मध्ये अनुष्काने शाहरुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे. त्यासह कॅटरिना कैफही या चित्रपटात आहे. या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असताना कोहलीने या चित्रपटाचे कौतुक केल्याने नेटिझन्स चांगलेच भडकले. त्यांनी कोहलीला संघातील 'Zero' कडे अर्थात लोकेश राहुलकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअनुष्का शर्माझिरो सिनेमा