Join us

IND vs AUS 3rd Test : विराट कोहली 82 धावांवर बाद झाला, पण विक्रम करून गेला

IND vs AUS 3rd Test: चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 09:17 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीने माजी फलंदाज राहुल द्रविडचा विक्रम मोडलाकॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा कोहलीचा पराक्रमदक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या विक्रमाला धोका

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. पुजाराने कारकिर्दीतील 17 वे कसोटी शतकं पूर्ण करताना अनेक विक्रम मोडले. पुजारा व कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. ही जोडी मिचेल स्टार्कने संपुष्टात आणली. स्टार्कने कोहलीला बाद केले. कोहली 82 धावांवर बाद झाला, परंतु एक विक्रम नावावर करुन गेला.

मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पुजाराने शतकी खेळी केली. पुजाराने हे शतक झळकावण्यासाठी 280 चेंडू खेळला आणि त्याचे हे सर्वात संथ शतक ठरले आहे. 1 जानेवारी 2017 पासून ते आत्तापर्यंत सर्वाधिक 4603 चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही पुजाराने नावावर केला आहे. या विक्रमात कोहली 3808 चेंडूंसह दुसऱ्या स्थानावर आहे. 123 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्टार्कने अॅरोन फिंचकरवी कोहलीला झेलबाद केले. कोहलीने 204 चेंडूंत 9 चौकारांसह 82 धावा केल्या. कोहलीने 82 धावांच्या खेळीसह एक विक्रम नावावर केला.

कॅलेंडर वर्षात परदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर करण्यासाठी कोहलीला 82 धावा हव्या होत्या. हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने 2002 मध्ये 1137 धावा केल्या होत्या आणि कोहलीच्या नावावर 1065 धावा होत्या. मेलबर्न कसोटीत कोहलीने 82 धावा करताना हा विक्रम मोडला. कोहलीनच्या नावावर 2018 या कॅलेंडर वर्षात 1138 धावा झाल्या आहेत.

मात्र, कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीला खुणावत आहे. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 156 धावा केल्यास तो दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथचा 1212 ( 20 डाव 2008 साल) धावांचा विक्रम मोडेल. त्याने पहिल्या डावात 82 धावा करून या विक्रमाच्या दिशेने कूच केली आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया