Join us

IND vs AUS 3rd Test : अजब योगायोग... विराट-अनुष्कासाठी २०१८चा समारोप 'झीरो'नेच!

IND vs AUS 3rd Test: भारताने तिसऱ्या दिवसअखेर 346 धावांची आघाडी घेतली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 13:03 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेऊनही यजमान ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला नाही. दुसऱ्या डावात धावांचा पाऊस पाडून ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्म लक्ष्य उभारण्याचा कर्णधार विराट कोहलीचा मानस होता. मात्र, खेळपट्टीचा अंदाज घेण्यात कोहली चुकला आणि दुसऱ्या डावात भारताचे पाच फलंदाज अवघ्या 54 धावांवर माघारी परतले. भारताने तिसऱ्या दिवसअखेर 346 धावांची आघाडी घेतली आहे. 

पहिल्या डावात भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारे चेतेश्वर पुजारा ( 106) आणि कोहली ( 82) यांना दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. पॅट कमिन्सने दोघांनाही बाद केले. 2018 वर्षांत धावांचे, विक्रमांचे इमले रचणाऱ्या कोहलीला शून्य धावेने वर्षाचा निरोप घ्यावा लागला. झीरोवर बाद होणाऱ्या कोहलीवर सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले. 

कोहलीवरील जोक्स आणि त्यात अनुष्का शर्माचा सहभाग नसेल तर नवलच. याही जोक्समध्ये अनुष्का आली आणि आश्चर्याची बाब म्हणजे कोहलीच्या आजच्या खेळीने अजब योगायोग जुळवून आणला आहे. बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खान याची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि त्यात अनुष्काने मोठी आव्हानात्मक भूमिका निभावली आहे. 2018 मधील तिचा हा शेवटचा चित्रपट होता आणि तोच धागा पकडून सोशल मीडियावर जोक्स फिरत आहेत. अनुष्का आणि कोहली या दोघांनीही 2018चा समारोप झीरोनेच केला. 

टॅग्स :विरूष्काभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीअनुष्का शर्मा