मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने शेवटच्या दिवशी विजय मिळवला. भारतीय संघाने कंगारूंवर 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन भूमिवर 2-1 अशा फरकासह मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना कांगारूंचा दुसरा डाव 261 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराने सामन्यात ( 6/33 व 3/53) नऊ विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय आहे. 'विराट'सेनेच्या या विजयाचे दिग्गजांनी तोंडभरुन कौतुक केलं.