Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतचे ऑसी कर्णधाराला जशास तसे उत्तर, पाहा व्हिडीओ

IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन त्याच्या नेतृत्वशैली आणि फलंदाजीपेक्षा यष्टिमागील शेरेबाजीने चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 10:05 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन त्याच्या नेतृत्वशैली आणि फलंदाजीपेक्षा यष्टिमागील शेरेबाजीने चर्चेत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, रिषभ पंत या सर्वांना त्याने शेरेबाजी मारून डिवचण्याचा प्रयत्न केला. भारताच्या दुसऱ्या डावातही पेनने यष्टिरक्षक पंतला डिवचले होते. महेंद्रसिंग धोनी आता संघात येतोय, तुला बिग बॅश लीगमधील संघात मी घेतो, असा टोला पेनने पंतला लगावला होता. त्यावर पंतने शनिवारी जशास तसे उत्तर दिले. 

भारताच्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 138 धावांवर माघारी परतला होता. पेन व ट्रॅव्हीस हेड हे चहापानापर्यंत मैदानावर खेळत होते. यावेळी पेन फलंदाजी करत असतान पंतने यष्टिमागून शेरेबाजी सुरू केली. त्याने मयांकशी संवाद साधताना पेनला तात्पुरता कर्णधार म्हणून असा टोमणा मारला. पाहा व्हिडीओ... 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंत