Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 3rd Test : रिषभ पंतने 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला

IND vs AUS 3rd Test: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:45 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा झेल टिपला. या मालिकेतील त्याचा हा 18वा झेल ठरला आणि एका मालिकेत सर्वाधिक झेल टिपणाऱ्या भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला. 

पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांत 18 झेल टिपले आहेत. त्याने या कामगिरीसह सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. दोघांनी प्रत्येकी 17-17 झेल टिपले होते. मुख्य म्हणजे किरमानी यांना 17 झेलसाठी 6 कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागली होती. धोनीने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 17 झेल पकडले. पंतने केवळ तीन सामन्यांत हा पराक्रम केला.  पंतने अॅडलेड कसोटीत 11 झेल घेतले होते आणि त्याने एका सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा जॅक रसेल आणि एबी डि'व्हिलियर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्यानंतर पंतने पर्थवर खेळलेल्या दुसऱ्या कसोटीत चार  आणि आज त्याने आणखी तीन झेल घेतले.  रत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान पंतने पर्थ कसोटीतच पटकावला होता. त्याने याही वेळेला धोनी व किरमानी यांचा 14 विकेटचा विक्रम मोडला.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिषभ पंतबीसीसीआयमहेंद्रसिंग धोनी