मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : गोलंदाजांच्या अचुक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीवर पकड घेतली आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत कांगारूंचे सात फलंदाज 145 धावांवर माघारी पाठवले आहे. भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आणि त्याचा पाठलाग करताना यजमानांची तारांबळ उडाली आहे. उपाहारापर्यंतच्या डावात जसप्रीत बुमराने सर्वाधिक तीन विकेट, तर रवींद्र जडेजाने 2 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी एक विकेट टिपली. शमीने पॅट कमिन्सची विकेट घेत परदेशात बळींचे शतक साजरे केले.
भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचे 6 फलंदाज 102 धावांवर माघारी पाठवले होते, परंतु कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारताची डोकेदुखी वाढवली. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने जलदगती गोलंदाज शमीला पाचारण केले. शमीने टिच्चून मारा करताना कमिन्सला बाद केले. हेड व कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. शमीने कमिन्सचे विकेट घेत परदेशात बळींचे शतक साजरे केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दहा गोलंदाज आहे. शमीसह भारताच्या पाच जलदगती गोलंदाजांनी परदेशात शंभर विकेट घेतल्या आहेत.
![]()