ठळक मुद्देभारताची पहिल्या दिवसाच्या खेळावर पकडमयांक अग्रवाल व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळीभारताच्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मयांक अग्रवालने रचलेल्या मजबूत पायावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी खेळी करताना भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करून दिली आहे. भारताने बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली (47) आणि चेतेश्वर (68) खेळत आहेत. 47 धावांवर असताना कोहलीला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनकडून जीवदान मिळाले. त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांने कोहलीला या कसोटीत शतक ठोक अन्यथा निवृत्ती स्वीकार असं खुलं चॅलेंज दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिचेल जॉन्सनने पुन्हा एकदा कोहलीला टार्गेट करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. यावेळी त्याने कोहलीला थेट निवृत्ती स्वीकारण्याचा आव्हान केले. मेलबर्न कसोटीत शतक झळकावण्यास अपयशी ठरल्यास कोहलीने निवृत्ती पत्करावी अशी टीका त्याने केली. 37 वर्षीय जॉन्सनने एका मोकळ्या रस्त्याचे चित्र पोस्ट केल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेदरम्यान जॉन्सनने हा सल्ला दिला.
याआधीही जॉन्सनने कोहलीवर टीका केली आहे. मैदानावरही जॉन्सन आणि कोहली यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचा इतिहास सांगतो. निवृत्तीनंतर जॉन्सन सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहे. 2014-15च्या कसोटी मालिकेत जॉन्सन आणि कोहली यांच्यात वाद पाहायला मिळाले होते.