ठळक मुद्देऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत चेतेश्वर पुजाराचे शतकपुजाराचे मालिकेतील दुसरे शतकबॉक्सिंग डे कसोटीत शतक ठोकणारा पाचवा भारतीय
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला आहे. ॲडलेड कसोटीपाठोपाठ पुजाराने मेलबर्नवरही शतक झळकावले. त्याचे हे कारकिर्दीतील 17 वे आणि ऑस्ट्रेलियातील दुसरे शतक ठरले. त्याने कर्णधार विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. या खेळीच्या जोरावर भारताने उपाहारापर्यंत 2 बाद 277 धावांपर्यंत मजल मारली.
मयांक अग्रवालने घातलेल्या मजबूत पायावर पुजारा आणि कोहली यांनी धावांचे इमले उभे केले. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटीत भारताचे पारडे जड झाले आहे. पुजाराने 280 चेंडूंत 10 चौकाराच्या मदतीने शतक झळकावले. त्याने कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावण्यासाठी 250 हून अधिक चेंडू खेळले. म्हणजे त्याचे हे सर्वात संथ शतक ठरले. याशिवाय 1 जानेवारी 2017 नंतर सर्वाधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या फलंदाजांमध्ये पुजाराने अग्रस्थान पटकावले आहे.
बॉक्सिंग डे कसोटीत मेलबर्नवर शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. याआधी सचिन तेंडुलकर (116 धावा 1999), वीरेंद्र सेहवाग ( 195 धावा 2003),
विराट कोहली ( 169 धावा 2014), अजिंक्य रहाणे ( 147 धावा 2014) यांनी ही कामगिरी केली आहे.